मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जत येथील शिबिरात त्यांचा गट लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच अजित पवार गट आपली राजकीय ताकत जास्त असल्याचा दावा करत ११ पेक्षा जास्त जागांवर दावा केला आहे. काही दिवसांपासून महायुतीत काहीतरी बिनसले असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना शिंदे गट लोकसभेच्या १३ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली असल्याचा दावा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप २६ जागा तर अजित पवार आणि शिंदे गट २२ लोकसभेच्या जागा लढणार असल्याची माहिती दिली होती. याबाबत खासदार हेमंत पाटील यांना विचारले असता आम्ही १३ जागा लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वतः शिंदे साहेबांनी अमित शहा यांच्याशी बोलणी करून १३ जागा मिळणार असल्याचे स्पष्ट केले होते, त्यामुळे आम्ही १३ लोकसभेच्या जागा लढवणार आहोत असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. अजित पवार गटाने आणि शिंदे गटाने त्यामुळे या दोन्ही गटांना किती जागा द्यायच्या याबद्दल आता भाजप काय भूमिका घेणार याकडे पाहावं लागेल.