34 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचा लोकसभा निवडणुकीचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रकाशित केला. या वचननाम्यात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील पाच वर्षे स्थिर ठेवण्याचे, एक वर्षांत ३० लाख सरकारी नोक-या देण्याचे व केंद्र सरकारच्या नोक-यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच शेतक-यांच्या खते,बी-बियाणे,औजारे आदींवरील जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात येईल. जैतापूर, बारसू, वाढवण सारखे विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात येउ देणार नाही. तसेच सध्या सगळे काही मी आणि मीच ही हुकुमशाही सुरू आहे ती मोडून काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सत्तेचे विकेंद्रीकरण करू. कर दहशतवाद थांबवू व जीएसटीमधील जाचक अटीशर्ती दूर करू असे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

उदधव ठाकरे यांनी मातोश्री येथे आयोजित पत्रकारपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित केला. देशपातळीवर इंडिया आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित झाला आहे. आघाडीतील इतर घटक पक्षांचेही जाहीरनामे आले आहेत. आघाडीत असलो तरी आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत. आम्ही काही पक्ष विलीन केलेले नाहीत. त्यामुळे आमचा स्वतंत्र वचननामा आला असल्याचे उदधव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना ठाकरे गटाला उबाठा असे म्हणण्यात येते त्यावर प्रत्युत्तर म्हणून उदधव ठाकरे यांनी एसंशिं सेना असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

गेल्या सव्वा दोन वर्षांत सरकार गद्दरी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एककलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करते आहे. उदयोगधंदे पळविले,हिरेबाजार अगदी क्रिकेटची मॅचही पळविली. महाराष्ट्राचे वैभव लुटले जाते आहे. ही लूट इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर थांबवू. मोदी सरकार हे महाविकास आघाडीच्या सरकारला काहीही मदत करत नव्हते. इंडिया आघाडीचे सरकार येईल. विधानसभेनंतर राज्यातही आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर जो काही खडडा मोदीसरकारने पाडला आहे. तो दूर करून आर्थिक केंद्र,गिफट सिटी गुजरातला पळविली. आम्ही गुजरातचे पळवून नेणार नाही बिहार उत्तरप्रदेश,आसाम सर्व राज्यांचा आदर करून जे हवे असेल ते देउच. पण वित्तीय केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभे करू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जेव्हा राज्यात युती सरकार होते तेव्हा पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवू. शहरात रोजगार देताना ग्रामीण भागातही अनेक तरूण शिकलेले आहेत पण नोकरीची संधी नाही. म्हणून त्यांना स्थलांतर करावे लागत आहे. ग्रामीण भागात तिथल्या तिथे रोजगार कसा निर्माण होईल त्यावर जोर देणार आहोत. १ वर्षांत ३० लाख तरूण आणि तरूणींना रोजगार देउ. केंद्र सरकारमधील सर्व नोक-यांत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देउ असेही उदधव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR