34 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूरलोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही निवडणूक

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही निवडणूक

चाकूर : प्रतिनिधी
भारताच्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी, हूकुमशाहीला विरोध करणारी ही निवडणुक असून खोटे आश्वासन देणा-या भाजपाला जनता जाब विचारणारी ही निवडणुक असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना मतदार बहूमतांनी विजयी करतील, असे प्रतिपादन जानवळ येथील जाहीर सभेत आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी केले.
मंचावर लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती निळंकठ मिरकले, जिल्हा बँकेने संचालक एन.आर.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगीरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नंदकुमार पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे, अहमदपुर तालूका कॉग्रेंस कमिटीचे अध्यक्ष डॉ.गणेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मद्दे, माजी पंचायत समीती सदस्य अनिल चव्हाण, शहराध्यक्ष कॉंग्रेस पप्पू शेख, सोशल मिडीया प्रमुख सलीम तांबोळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाबुमिया दापकेवाले, अहमदपूर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निलेश देशमुख, नगरसेवक अभिमन्यू धोंडगे हे उपस्थित होते.  आमदार देशमुख म्हणाले की, प्रत्येक भारतीयांना पंधरा लाखांचे दिलेल्या स्वप्नाचे काय झाले. शेतीमालाच्या पडत्या भावाचे काय, वाढ़ती महागाई, वाढती बेरोजगारी, गॅस पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्याकिंमती याचा जाब जनता मतदानाच्या माध्यमातून विचारणार आहे आणि केंद्र सरकार फक्त उद्योगपतीचे आहे.
सर्वसामान्य जनतेच्या मुलभुत गरजा काय आहेत. याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पाच गॅरंटी देण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रंिबदू मानून विकास करण्यात येणार आहे. गरिब कुटुंबातील प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. शेतक-यांसाठी स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बेरोजगार तरूणांना नोकरी देणार आहेत. महिलासाठी लखपती योजना राबविली जईल अशा लोकअभिमुक योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविल्या जातील असे ते म्हणाले. या सभेला जानवळ आणि पंचक्रोशीतील गावातील मतदार नागरिक उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR