24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रशुभमन गिल जगातील नंबर १ फलंदाज

शुभमन गिल जगातील नंबर १ फलंदाज

आयसीसी क्रमवारीत बाबर आझमला टाकले मागे

नवी दिल्ली : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याला जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयसीसीने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर १ फलंदाज आहे. यापूर्वी वनडे फॉरमॅटमध्ये नंबर १ चा मुकुट पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या डोक्यावर होता. मात्र, आता शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत नंबर १ स्थान पटकावले आहे.

शुभमन गिल गेल्या एका वर्षापासून फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा तिनही फॉरमॅटमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये शुभमन गिलने इतकी चांगली कामगिरी केली की, भारतीय संघ व्यवस्थापनाला शिखर धवनसारख्या तेजस्वी खेळाडूकडेही दुर्लक्ष करावे लागले. गिलने सातत्याने केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे अल्पावधीतच टीम इंडियाचा सलामीवीर म्हणून कर्मधार रोहितसह धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या ओपनिंग पार्टनरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्यामुळे वर्ल्डकपसाठी उशिरा प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा उशिरा समावेश करण्यात आला.

भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-१० मध्ये समावेश
विश्वचषकात धावा करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचाही शुभमन गिलसह टॉप-१० क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR