24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपहिल्यांदा तुमच्या वाचाळ लोकांची तोंड आवरा!

पहिल्यांदा तुमच्या वाचाळ लोकांची तोंड आवरा!

मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले

आंतरवाली सराटी : लाखोने शांततेत मोर्चे काढणा-या मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चाललं आहे, याचा विचार मनोज जरांगे यांनी करावा, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीही अत्यंत कडक शब्दात मुख्यमंर्त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सुनावले. पहिल्यांदा तुमच्या वाचाळ लोकांची तोंड आवरा, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, उलट त्यांच्याच सरकारमधील लोक कार्यालय फोडा म्हणतात. आम्ही आमच्या हक्काचे कुणबी प्रमाणपत्र मागत आहे. मराठा आंदोलनाबाबत तुम्ही पंतप्रधाना बोलले का? केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पीटिशनची तारीख पडूच शकत नाही. तुम्ही शिर्डीत येऊन काहीच बोलले नाहीत. शिंदे समितीचा अहवाल पुरावे पुरेसा आहे. आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. आणखी ६ टप्पे बाकी आहेत, सरकारने धोरणात यावे आणि गांभीर्याने घ्यावं, समितीचे काम बंद करावे असा टोलाही त्यांनी लगावला.

जरांगेंची डोळे पाणावले
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी शेकडो लोकांनी हात जोडून प्रार्थना केली. यावेळी त्यांनी विनंतीला मान देत पाणी घेण्याची विनंती मान्य केली. मात्र, सरकारला एखादा बळी द्यायचा असेल तर घेऊ द्या, जाणूनबुजून आपल्या समाजाच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे. न्याय मिळवण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी एका जणाचा जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळला पाहिजे, न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, असे बोलताना मनोज जरांगे पाटील यांचे डोळे पाणावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR