सिद्धरामय्यांचा राजीनामा; डीके होणार नवे सीएम

बंगळूरू : कर्नाटकच्या या हायव्होल्टेज राजकीय नाट्याचा अखेर क्लायमॅक्स समोर आला असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची अधिकृत घोषणा करीत राजीनामा दिला आहे. आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या ब्रेकफास्ट मीटिंग दरम्यान त्यांनी भावूक वातावरणात हा मोठा निर्णय मंत्र्यांसमोर जाहीर केला. या घोषणेसोबतच कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये आता मोठ्या नेतृत्वबदलावर शिक्कामोर्तब झाले असून कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार शपथ घेतील.

आज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होणार होती, मात्र ती एक तास उशिराने म्हणजेच १० वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वत: एक तास उशिराने डायनिंग टेबलपाशी पोहोचले, जिथे सर्व मंत्री त्यांची वाट पाहत होते. अत्यंत भावनिक वातावरणात सिद्धरामय्या यांनी आपण पद सोडत असल्याचे जाहीर केले, ज्यामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली होती.

दिल्लीहून परतलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार विमानतळावरून थेट सिद्धरामय्या यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कर्नाटक काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसल्याचा संदेश देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना घट्ट मिठी (गळाभेट) मारली. इतकेच नाही तर, डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. या दृश्यामुळे कर्नाटकात आता डी. के. शिवकुमार यांच्याच राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

ब्रेकफास्टचा दाक्षिणात्य बेत
सिद्धरामय्या यांच्या घरी मंत्र्यांसाठी खास दाक्षिणात्य बेत आखण्यात आला होता. मेन्यूमध्ये मऊ इडली, गरमागरम वडा आणि खमंग मसाला डोसा होता. यासोबतच पोंगल, उप्पित (उपीट), केसरीबाथ, सागू, सांभर आणि चटणीचा आस्वाद मंर्त्यांनी घेतला. मात्र, या चवदार भोजनासोबतच राजकारणाचा मसाला अधिक कडू-गोड ठरला.

राज्यपालांअभावी राजीनाम्याचा पेच कायम
सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा केली असली आणि ते सकाळी ११ वाजता राजभवनावर जाणार असले, तरी राज्यपाल थावरचंद गेहलोत हे बंगळुरूत हजर नाहीत. ते बुधवारी मध्यरात्रीच ‘इमर्जन्सी’मुळे मुंबई आणि तिथून इंदूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या आपला राजीनामा राजभवनाच्या वरिष्ठ अधिका-यांकडे सोपवणार की राज्यपालांच्या ई-मेलवर पाठवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
REEL STAR|रील्स बनवणारी तरुणी निघाली चोर?एलसीबीची मोठी कारवाई
02:19
Video thumbnail
BIG BREAKING|खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात;चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
00:58
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. मनोज शिरूरे अटकेत;CBI ची मोठी कारवाई
03:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉ. शिरूरेनं मोटेगावकरला पेपर विकला?;मोटेगावकरचा मुलगा होणार माफीचा साक्षीदार?
03:01
Video thumbnail
Latur|तोंडार पाटीजवळ दाळ मिलच्या गोदामाला भीषण आग;अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
01:19
Video thumbnail
इंडिगो पायलटच्या कॅमेऱ्यात कैद भारत-पाक सीमेचे विलोभनीय रूप, रात्रीच्या झगमगाटाचा व्हिडिओ व्हायरल!
00:33
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगावात अभिवादन
01:03:45
Video thumbnail
"लातूरमध्ये केवळ कायद्याचेच राज्य चालेल", अनियमितता आढळल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत - अमित देशमुख
16:31
Video thumbnail
Nanded|नरसीत डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...
02:31
Video thumbnail
Nanded|मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ ; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
02:30

Latest news