मराठवाड्यात १९७२ च्या दुष्काळापेक्षा भीषण स्थिती

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात ब-याच भागात यंदा पाऊस चांगला झाल्याचा दावा केला जात असला तरी मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसाळ््याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली. आधून-मधून जेमतेम पाऊस झाला. त्यामुळे पिके वाढली. परंतु पिके ऐन फुलो-यात असतानाच पाऊस गायब झाला. त्यामुळे पिके वाढली तरी सोयाबीनच्या शेंगांची वाढच झाली नाही. ब-याच ठिकाणी तर जागेवरच पिके करपली. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला आहे.

आता या दुष्काळाची तुलना १९७२ च्या दुष्काळाशी केली जात आहे. परंतु यंदा त्यापेक्षा भीषण स्थिती आहे. कारण आता शेतीखर्च प्रचंड वाढला आहे. अशा स्थितीत एकही हंगाम हातातून गेल्यास शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडण्याचा धोका आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
१९७२ चा दुष्काळही भीषण होता. त्यावेळी अन्नधान्याची मारामार असल्याने खडी फोडून कामाच्या मोबदल्यात सुकडी खावून लोक जगले. त्यावेळीही असाच उशिरा पाऊस आला होता.

त्यामुळे शेतीपिके हाती लागली नव्हती. उशिरा पाऊस झाल्यावर झाडपाला खाऊन वेळ निभावून न्यावी लागली. परंतु त्यावेळी शेती खर्च जेमतेम होता. त्या तुलनेत आता शेती खर्च प्रचंड वाढला आहे. मिळणा-या उत्पन्नाच्या आशेने शेतक-यांनीही शेतीची मशागत आणि पेरणी, कोळपणीसह खत, किटकनाशक औषधीसाठी प्रचंड खर्च केलेला आहे. परंतु खरीप पिकेच करपून गेल्याने आता शेतक-यांना अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच अद्याप मोठा पाऊसच झाला नसल्याने नद्या, ओढे, प्रकल्प कोरडेठाक पडत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.

१९७२ चा दुष्काळ अनुभवलेल्या ज्येष्ठ शेतक-यांच्या मते त्यावेळी पाऊस कमी होता. त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या होत्या. त्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे त्यावेळी पाण्याची टंचाई नव्हती. सर्वत्र पाणी उपलब्ध होते. परंतु अन्नधान्याची टंचाई होती. त्यामुळे शेतात येणा-या पिकाचा आधार घेऊन सरकारी मदतीवर लोकांनी दिवस काढले. परंतु त्यावेळी गरजा मर्यादित असल्याने वेळ निभावून गेली. आता महागाई प्रचंड वाढली आहे. शेतीखर्चही भरमसाठ झाला आहे. त्यामुळे शेतकरी भीषण संकटात सापडला आहे.

सध्या राज्यात अधिकृतपणे कोणत्याही जिल्ह्यात किंवा तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला नाही. मात्र, अनेक भागांतील पावसाचा खंड, पिकांची स्थिती, पाणी उपलब्धता आणि चा-याची परिस्थिती यांचा आढावा घेतला जात आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३० सप्टेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

थेट दाणा भरण्याच्या अवस्थेत पिके करपली
पावसाअभावी सोयाबीन, कापसासह मका, बाजरी, मूग, मठ आणि कपाशी यांसारखी पिके दाणा भरण्याच्या अवस्थेतच करपल्याचा दावा स्थानिक शेतकरी करीत आहेत. जोरदार पाऊस झाला तरी काही पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

चारा, पाण्याचेही आता भीषण संकट
पाण्याच्या उपलब्धतेनुसार काही भागांत हिरवळ दिसत आहे किंवा चांगल्या जमिनीत शेत शिवारात पिकेही दिसत आहेत. परंतु पावसाअभावी या पिकांना लागणच नाही आणि जिथे लागण झालेली आहे. त्याची वाढच झालेली नाही. त्यामुळे शेती उत्पन्न हाती लागण्याची शक्यता नाही. त्यातच चारादेखील काही दिवस पुरेल इतकाच आहे. तसेच प्रकल्पांतील पाणीही तळाला गेले आहे. त्यामुळे पुढील काळात चारा आणि पाण्याच्या पाण्याचे भीषण संकट उद्भवू शकते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news