ड्रग्ज तस्करी प्रकरणी आणखी ६ जणांना अटक

परभणी : जिल्ह्यातील मानवत शहरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईला आता मोठे यश मिळाले असून २६ जुलै रोजी ७३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्या कसून चौकशीतून आणखी ६ आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत ६ जणांना अटक केली असता न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता ८ पोहोचली आहे.

मानवत तालुक्यातील रत्नापूर शिवारात २६ जुलै रोजी पोलिसांनी एमडी ड्रग्जची कारवाई करून ७३ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला होता. या वेळी दोघांना अटक करण्यात आली होती. सखोल चौकशीत अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीतील आणखी व्यक्तींची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. या तपासातून परळी, लातूर आणि कळंबपर्यंत ड्रग्जच्या व्यवहाराचे धागेदोरे जोडले जात असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि मानवत पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची भूमिका, त्यांनी अमली पदार्थ कोठून मिळवला, कोणाला पुरवठा केला तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान पोलिसांनी अमली पदार्थाची किंमत १४ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा अमली पदार्थ जप्त केल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, मानवतचे पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे यांच्या पथकाने केली. या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

सर्व आरोपींना ४ दिवसांची पोलिस कोठडी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका नगरसेवकासह परळी आणि लातूर येथील ६ आरोपींना पोलिसांनी गजाआड करीत न्यायालयात हजर केले असता सर्व आठही आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटकेतील आरोपींची नावे
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोसिन सलीम मिर्झा (वय ३८, रा. कळंब, जि. धाराशिव), आयान नासेर पठाण (वय २०, रा. बरकत नगर चौक, परळी, जि. बीड), शेख सलमान शेख खयुम (वय २८, रा. जुने रेल्वे स्टेशन, काक्कर मोहल्ला, परळी, जि. बीड), समीर शब्बीर सय्यद (वय ३१, रा. बरकत नगर, परळी, जि. बीड), अक्कीब आक्रमसाब मोमीन (वय ३१, रा. साळे गल्ली, लातूर) आणि बाबा रफिक मोमीन (वय ३४, रा. खाडगाव रोड, ख्वाजा नगर, लातूर) यांचा समावेश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news