स्मृती मंधानाचा टी-२० क्रिकेटमध्ये नवा कीर्तिमान!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लीड्समधील हेडिंग्ले इथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मंधानाने ४७ चेंडूंमध्ये ७४ धावांची शानदार खेळी केली. तिच्या या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मंधानाने आपल्या शानदार फलंदाजीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० चौकार मारून इतिहास रचला. यासह, ती पुरुष आणि महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट या दोन्हीमध्ये ६०० पेक्षा जास्त चौकार मारणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आपल्या फलंदाजीने सातत्याने विक्रम करत आहे. यामुळेच प्रत्येक सामन्यात एक मोठा विक्रम रचला जातो किंवा मोडला जातो. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मंधानाने एक असा विश्वविक्रम रचला, जो पुरुष किंवा महिला क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाने आजपर्यंत केलेला नाही.
स्पर्धेतील हे तिचे सलग दुसरे अर्धशतक होते. तिच्या शानदार खेळीमुळे भारताने २० षटकांत २०९ धावांचा डोंगर उभा केला आणि नंतर हा सामना ९५ धावांनी जिंकला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल मंधानाला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.

स्मृतीच्या नावावर आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६०४ चौकार आहेत. या यादीत न्यूझिलंडची सुझी बेट्स ५२१ चौकारांसह दुस-या क्रमांकावर आहे, तर श्रीलंकेची चमारी अथापथ्थू ४९३ चौकारांसह तिस-या क्रमांकावर आहे. पुरुष क्रिकेटमध्ये, पाकिस्तानचा बाबर आझम सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे, पण तोही मंधानाच्या मागे आहे. मंधाना केवळ चौकारांच्या बाबतीतच नव्हे, तर धावांच्या बाबतीतही अव्वल दोन खेळाडूंमध्ये आहे. महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर ४,४७५ धावा आहेत. तिच्यापेक्षा फक्त न्यूझिलंडची सुझी बेट्स पुढे आहे, जिच्या नावावर ४,७२० धावा आहेत. मात्र, बेट्स सध्याच्या टी-२० विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याने, मंधाना लवकरच हा विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news