27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर...तर शुक्रवारनंतर जिवंत समाधी घेणार!

…तर शुक्रवारनंतर जिवंत समाधी घेणार!

किल्लारी : वार्ताहर
मराठा आरक्षणचा प्रश्न ३ नोव्हेंबरपर्यंत न घेतल्यास व जरांगे पाटील यांचे उपोषण न सोडविल्यास संध्याकाळी जिवंत समाधी घेणार आसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी दिला आहे. कवठा गावामधे ग्रामपंचायत समोर मंगल कार्यालयात सामाजीक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी दि २८ तारखेपासुन अमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाबदल शासनाने निर्णय न घेतल्यास व वजरांगे पाटील याचे उपषोण शासनाने न थांबविल्यास संध्याकाळी सूर्यअस्तापूर्वी जीवंत समाधी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. १०० टक्के गुण घेऊनही मुलांना नोकरी लागत नाही.

भरपूर जमीनी नाहीत मुलांना भिक मागावयाची वेळ आली आहे मग मला जगण्याचा हक्क नाही असे सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी प्रतिधीसी बोलताना सांगितले कवठा गाव ते उमरगा-लातूर महामार्गावर नेल्याच्या प्रतिमेची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून महामार्गावर पंतप्रधान नरेन्द्र मोदी, अमीत शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणीस याच्या प्रतीकात्मक छायाचित्रांचे दहन करण्यात आले. यावेळी विजयकुमार सोनवणे, सरपंच विकास पाटील, नानाराव भोसले, अमोल चव्हाणा, हरी डावरे, महेश देशमुख यांच्यासह कवठा, नारंगवाडी, मातोळ आदी गावातील हजारो नागरीक उपस्थीत होते. नागरीक होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR