34.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeसोलापूरसोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लोकसभा पूर्वतयारीचा आढावा

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लोकसभा पूर्वतयारीचा आढावा

सोलापूर, – सर्व संबंधित तहसील कार्यालयांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मतदान कार्ड पोस्टाद्वारे अद्यापपर्यंत वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आले असून त्या सर्व तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करावा. एकही मतदार मतदान कार्डपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी, मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव,सांगोला तहसीलदार संतोष कणसे व निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण घम, सुरेंद्र परदेशीमठ आदी उपस्थित होते. आशीर्वाद म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील मतदारांमध्ये ईव्हीएम विषयी जनजागृती झाली पाहिजे, या अनुषंगाने मोबाइल व्हॅन प्रत्येक गावात जाऊन योग्य पध्दतीने प्रबोधन करत आहेत का याविषयी संबंधित तहसीलदार यांनी नियंत्रण ठेवावे. ईव्हीएमची तपासणी करावी, त्यासाठी टीम तयार कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

सर्व तहसीलदारांनी इपिक वितरण त्वरित करावे, सेक्टर ऑफिसरची त्वरित नियुक्ती करावी, मास्टर ट्रेनरचे प्रत्येक तालुक्यातून पाच नावे कळवावीत, तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता तालुकास्तरावर करून ठेवावी, प्रत्येक मतदार केंद्रावर जाण्यासाठी व परत मशीन घेऊन येण्यासाठी रूट प्लॅन तयार ठेवावा, आदी सूचनाही उपजिल्हा निवडणूक अधिकारी निहाळी यांनी दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR