सोलापूर : आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती – कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी २०२६ अखेर झालेल्या कामाबद्दल सोलापूर महापालिका राज्यात ९१ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. यासाठी सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. राखी माने आणि त्यांच्या टीमने चांगली कामगिरी बजावली आहे.
आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती अतंर्गत कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत फेब्रुवारी- २०२६ अखेर झालेल्या कामाचा जिल्हा व महापालिकानिहाय अहवाल दि. १६ मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानूसार सर्व जिल्हे व महापालिका यांचा गुणानुक्रम अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार राज्यस्तरावर माहे फेब्रुवारी २०२६ अखेर सर्व निर्देशांकाचे काम ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार पूर्ण होणे अपेक्षित होते. शासकीय आरोग्य संस्थेत झालेल्या एकूण प्रसूती पैकी केवळ २३ टक्के पीपीआययूसीडी बसविण्यात आल्या आहेत.
जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, श्री नसबंदी शस्त्रक्रिया, बाळाचे लसीकरण, कुपोषित बालक नोंदणी आणि उपचार, रजा निवृत्ती महिलांची तपासणी, व निदान तसेच कर्करोग तपासणी ही विशेष मोहीम वेगवेगळ्या कार्यक्रमातून सोलापुर महापालिका यांच्याकडून करण्यात आल्याया माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी दिली.

