सोलापूर हादरलं! १४ वर्षीय मुलीसह आईची रेल्वेखाली उडी; दुर्दैवी घटनेमागील कारण अद्याप गूढ

सोलापूर : शहरात रविवारी पहाटे घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सोलापूर हादरून गेले आहे. विजापूर रोड परिसरातील टिकेकर वाडी रेल्वे मार्गावर एका ३३ वर्षीय महिलेने आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरासह सुशीलनगर आणि सैफूल परिसरात तीव्र शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेल्या आईचे नाव वर्षा पांडुरंग आधटराव (वय ३३ वर्षे) आणि मुलीचे नाव स्वरा पांडुरंग आधटराव (वय १४ वर्षे) असे आहे. या दोघी मूळच्या सोलापूर येथील सुशीलनगर आणि सैफूल परिसरातील रहिवासी होत्या.

पोलीस तपासातून आणि नातेवाईकांच्या माहितीवरून समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पती पांडुरंग आधटराव आणि पत्नी वर्षा यांच्यात कौटुंबिक कारणावरून जोरदार भांडण झाले होते. वाद विकोपाला गेल्यानंतर मध्यरात्री सुमारे १२ च्या सुमारास पतीने पत्नी वर्षा आणि मोठी मुलगी स्वरा या दोघींना सुशीलनगर येथील वर्षाच्या मावशीच्या घरी आणून सोडले आणि तो स्वतःच्या घरी निघून गेला. मावशीच्या घरी सोडल्यानंतर काही वेळातच, म्हणजे मध्यरात्री १२:३० ते १ च्या सुमारास, वर्षा आपल्या मुलीला घेऊन शांतपणे घराबाहेर पडल्या. आसरा ब्रिजवरून पुढे चालत जात दोघी होटगी रोड-विजापूर रोड परिसरातील आयकर भवनामागील टिकेकर वाडी रेल्वे रुळावर पोहोचल्या. पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत किंवा रुळावर बसून त्यांनी जीवन संपवले. रेल्वेच्या भीषण धडकेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

रविवारी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास रेल्वे कर्मचार्‍यांना रुळावर दोन मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाणे आणि रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) पाठवून दिले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वर्षाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वाद होत होते. वर्षाने काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षात (भरोसा सेल) तक्रार दाखल केली होती, जिथे समुपदेशन करून वाद मिटवण्यात आला होता; मात्र तरीही वाद सुरूच राहिला. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. सध्या विजापूर नाका पोलीस दोघींचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवून आत्महत्येमागचे नेमके कारण शोधत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news