नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती गुरुवारी अचानक खालावल्याने त्यांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित आहे.
डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि उद्या अर्थात शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. डिसेंबर २०२४ मध्ये सोनिया गांधी ७८ वर्षांच्या झाल्या आहेत.