34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमुख्य बातम्याइस्रो लाँच करणार अत्याधुनिक हवामान आणि डिझॅस्टर वॉर्निंग सॅटेलाईट!

इस्रो लाँच करणार अत्याधुनिक हवामान आणि डिझॅस्टर वॉर्निंग सॅटेलाईट!

नवी दिल्ली : इस्रो सध्या यावर्षीच्या आपल्या दुस-या मोठ्या मोहिमेच्या तयारीत आहे. १७ फेब्रुवारी रोजी इन्सॅट-३डीएस या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी इस्रोचे जीएसएलव्ही-एफ१४ हे रॉकेट वापरले जाणार आहे.

१७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता हे प्रक्षेपण पार पडेल. हा भारताचा सगळ्यात आधुनिक हवामान आणि आपत्ती इशारा देणारा उपग्रह आहे. या उपग्रहाला जिओसिन्क्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. हे प्रक्षेपण जर तुम्हाला प्रत्यक्ष पहायचे असेल, तर त्यासाठी रजिस्ट्रेशन आज सुरू होणार आहे. इस्रोने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR