30.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeमहाराष्ट्रनगर-पुणे रोडवर एसटी बस जळून खाक

नगर-पुणे रोडवर एसटी बस जळून खाक

अहिल्यानगर : नगर-पुणे रोडवर एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली असून ही बस पुण्याकडे जात होती. यावेळी एसटी बसला भीषण आग लागून बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अस्पष्ट असल्याची माहिती मिळत आहे.

चालकाने प्रसंगावधान राखत एसटी रोडच्या कडेला घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एसटी बस जळत असल्यामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. सध्या या रस्त्यावर धीम्या गतीने वाहतूक सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एसटी बसला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजुला उन्हाचा पारा चांगलाच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. दुस-या बाजूला अनेक ठिकाणी रस्त्यांचे देखील प्रश्न आहेत. त्यामुळे काही ठिकाणी एसटीचे अपघात देखील होतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR