28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयजगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी; ३ ठार

जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी; ३ ठार

जगन्नाथ यात्रेला गालबोट १० गंभीर जखमी

पुरी : जगन्नाथाच्या रथाला स्पर्श करण्यासाठी भाविकांनी पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ केलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १० जण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी पहाटे ४.०० ते ५.०० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथाच्या रथाला स्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली. परिणामी, नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि ढकलाढकली झाली. त्यावेळी नंदीघोष रथाच्या चाकाजवळ अनेक भाविक एकमेकांच्या अंगावर पडले. या घटनेत तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तर, १० हून अधिक जण जखमी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR