बारावीच्या २८ केंद्रांच्या निर्णयाविरोधात राज्य मंडळ आता सर्वोच्च न्यायालयात

छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील कारवाईवरून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शैक्षणिक संस्थांमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत गैरप्रकार आढळल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील २८ परीक्षा केंद्रे रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द ठरवत केंद्रे पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्याने, बोर्डाने आता या आदेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या बारावी परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार आढळल्याने मंडळाने २८ केंद्रांवर कारवाई केली होती. याविरोधात ११ कनिष्ठ महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. केवळ एका विद्यार्थ्याकडे एक कॉपी सापडली म्हणून संपूर्ण केंद्र रद्द करणे हे मनमानी आणि अन्यायकारक आहे असे मत न्यायालयाने नोंदवले होते. या प्रकरणी कोल्हापूर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेत आता राज्य मंडळ सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे काय?
न्यायालयाने केंद्र पूर्ववत करण्याचे आदेश दिले तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. अवघ्या पाच दिवसांवर परीक्षा असताना विद्यार्थ्यांना जुन्या केंद्रांचीच प्रवेशपत्रे मिळाली आहेत. आम्ही दोन्ही परिस्थितींसाठी तयार आहोत असे बोर्ड म्हटले आहे.

संस्थाचालकांचा संताप
दुसरीकडे, संस्थाचालकांनी बोर्डाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दहा-बारा वर्षांत जेथे एकही कॉपी सापडली नाही, अशा छोट्या संस्थांना नाहक त्रास दिला जात आहे. जेथे सामूहिक कॉपीचे प्रकार घडले, तिथली केंद्रे मात्र सुरू आहेत असा आरोप संस्थाचालकांनी केला आहे. न्यायालयाच्या निर्देशांनंतरही केंद्र पूर्ववत न मिळाल्याने शैक्षणिक संस्थांमध्ये संतापाची भावना आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news