28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात ६ डिसेंबरला राज्यस्तरीय बँकिंग परिषद

पुण्यात ६ डिसेंबरला राज्यस्तरीय बँकिंग परिषद

पुणे : नागरी सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन म्हणजेच रेग्युलेटरी कम्प्लेयन्स आणि तांत्रिक अनुप्रयोग म्हणजेच आयटीचा उपयोग कशाप्रकारे व्हावा, त्याबाबत आव्हाने आणि संधी काय आहेत, याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने ६ डिसेंबरला राज्यस्तरीय बँकिंग परिषद येथे आयोजित करण्यात आली आहे.

पुण्यासह इतर जिल्ह्यांतील ११२ हून अधिक बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संगणक विभागप्रमुख व पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यस्तरीय परिषदेचे उद््घाटन बुधवारी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते, बाळासाहेब अनास्कर, अतुल खिरवाडकर, आमदार संजय जगताप, विजय ढेरे, रमेश वाणी, मिलिंद काळे, निलेश ढमढेरे, माजी आमदार नामदेव पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेत बँकिंग क्षेत्रात काम करणारे ३०० हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन – आव्हान व संधी, व्यय परिणामकारक तांत्रिक अनुप्रयोग आणि परिणामकारक तांत्रिक अनुप्रयोगाच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांचे नियामक अनुपालन आदी विषयांवर चर्चा व सुसंवाद होणार असून सहकारी बँकेतील निर्णयाचे अधिकारी असणा-या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये चर्चा व्हावी व सहकारात सहकार निर्माण होऊन नागरी सहकारी बँकांना बळ द्यावे, हा परिषदेचा उद्देश आहे. असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR