22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeपरभणीपरभणी मेडीकल कॉलेजमध्ये मानसिक आजारावर अत्याधुनिक उपचार

परभणी मेडीकल कॉलेजमध्ये मानसिक आजारावर अत्याधुनिक उपचार

परभणी : शहरातील परभणी मेडिकल कॉलेज व आर पी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे मानसिक आजारावरील अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे आता माफक दरात अत्याधुनिक उपचार होणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली.

आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी मेडिकल कॉलेज व आर पी हॉस्पिटल येथे मानसिक आजाराने त्रस्त रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारे अत्याधुनिक उपचार प्रणाली कार्यान्वित झाली असून यामध्ये मशीनद्वारे मेंदूत विद्युत लहरी प्रवाहित उपचार, मेंदूचा आलेख उपचार प्रणाली हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात माफक दरात सुरू करण्यात आली आहे.

या उपचारासाठी आधी रुग्णांना मुंबई, हैदराबाद इत्यादी ठिकानी जावे लागत. आता रुग्णांना परभणी मेडिकल कॉलेज येथेच अवघ्या ५०० ते १००० रुपयेमध्ये ही उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिझोफ्रेनिया, स्मृतीभ्रंश, नैराश्य, पार्किन्स, कॅटाटोनिया, बायपोलर डिसऑर्डर यासारख्या आजारावर अल्ट्रा बेरिफल्स या अत्याधुनिक मशीनद्वारे उपचार दर गुरुवार व शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परभणी वैद्यकीय महाविद्यालय व आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR