22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरहिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर : इस्लामिक रिसर्च फांऊडेशनचे डॉ. झाकीर नाईक याने हुडा टी.व्ही. नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर मुलाखत देतांना अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. यातून धार्मीक भावना दुखावल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. या वेळी निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे यांच्यासह संदीप ढगे, धनंजय बोकडे, शुभम रोहिटे, बसवराज पाटील इत्यादी उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR