28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनांदेडसह बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक

नांदेडसह बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे सुद्धा समोर येत आहे. आज देखील बीड आणि नांदेड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रवाशांना आधीच खाली उतरवण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बीडमध्ये रात्रीपासूनच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक लागल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री मराठा आंदोलकांनी एका बसला आग लावल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा कल्याण-बीड या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. यामध्ये बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. बीडहून कल्याणकडे जाणारी एसटी बस चराटा फाट्याजवळ आली असता, यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून या बसवर तुफान दगडफेक केली. यामध्ये बसच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. तर, रात्री मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलकांनी पालीजवळ एका बसला आग लावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे.

नांदेडमध्येही बसवर दगडफेक…
बीडप्रमाणेच नांदेड जिल्ह्यात देखील आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. शनिवारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मार्लेगावजवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिली होती. तर, आज पुन्हा एका बसवर दगडफेक करण्यात आली आहे. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा येथे अज्ञात मंडळीने एसटी बसवर दगडफेक केली आहे. यात एसटी बसच्या काचा फुटून नुकसान झाल्े आहे. या प्रकरणी पोलिस दगडफेक करणा-या लोकांचा शोध घेत आहेत.

अज्ञात लोकांनी पेटवून दिली एसटी बस…
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मार्लेगावजवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिली होती. बसमध्ये असलेले सर्व ७३ प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, लावलेल्या या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नांदेडच्या हदगाव आगाराची ही बस नागपूरकडे जात होती. त्याचवेळी मराठवाडा-विदर्भ सीमेवरच्या पैनगंगा नदीच्या पुलावर बसला थांबवत अज्ञात लोकांनी आग लावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR