25.2 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeराष्ट्रीयस्टीव जॉब्सच्या पत्नीस शिवलिंगाला स्पर्श करण्यापासून रोखले?

स्टीव जॉब्सच्या पत्नीस शिवलिंगाला स्पर्श करण्यापासून रोखले?

वाराणसी : लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी मंदिरातील परंपरांचे पालन केले आणि गंगेचे दर्शन घेतले. पुढे ते म्हणाले, भारतीय परंपरेनुसार काशी विश्वनाथमध्ये कोणी अन्य हिंदू शिवलिंगाला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी बाहेरून शिवलिंगाचे दर्शन घेतले.

अ‍ॅपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्सची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभमध्ये सामील होणार आहेत. यासाठी त्या भारतात दाखल झाल्या आहेत आणि त्यांनी प्रयागराज जाण्यापूर्वी शनिवारी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज त्यांच्यासोबत उपस्थित होते. उद्या १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होणार आहे. कैलाशानंद गिरी महाराज यांनी लॉरेन पॉवेल जॉब्सला आपली मुलगी असल्याचे म्हटले.

मी तिला माझे गोत्र दिले आहे. त्याशिवाय तिला कमला हे नवे नाव ठेवण्यात आले आहे. वाराणसीहून त्या प्रयागराजला जातील. ते दुस-यांना भारतात आल्या आहेत. स्टीव्ह जॉब्स यांना हिंदू धर्माबद्दल खास आस्था होती. १९७४ मध्ये ते अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी भारतात आले होते. यावेळी ते नीम करोली बाबाच्या कैंची धाम आश्रमातही गेले होते. निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनी पुढे सांगितले की, आज महादेवाची प्रार्थना करण्यासाठी काशीला आलो आहे. कुंभमेळाव्यात कोणताही अडसर येऊ नये यासाठी पूजा करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR