22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय तपास यंत्रणेची धडक कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणेची धडक कारवाई

ठाणे, कल्याण, भिवंडीत आयसिसशी संबंधित ठिकाणांवर छापे

ठाणे :  ईसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडीसह देशभरात तब्बल ४४ ठिकाणी एनआयएच्या पथकांनी मोठ्या फौजफाट्यासह छापासत्र राबवले. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचन व अतिफ नाचन यांना पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटे ठाणे, पुणे, भिवंडीतील पडघा येथे एनआयच्या पथकांनी छापे टाकले. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. या छाप्यांवेळी एनआयएने तब्बल १५ लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

छापेमारीदरम्यान एनआयएने काही लोकांकडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. हे सर्वजण देशात बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखत होते.
प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीतील पडघा हे गाव एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने पुन्हा छाप टाकून आणखी काहीजणांना ताब्यात घेतले.

भिवंडीत सुध्दा एनआयएच्या पथकांकडून कारवाई सुरू आहे. शहरातील तीनबत्ती, शांतीनगर व इस्लामपुरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याशिवाय, कर्नाटक आणि बंगळुरूतही छापेमारी करण्यात आली. पडघानजीकच्या बोरिवली गावात एनआयएने कारवाई केली. गावातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईवेळी गावात ठाणे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR