नांदेड(प्रतिनिधी)
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक विर्श्वदिप रोडे यांना निलंबन करण्याचे आदेश पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जारी केले आाहेत, आणि आजच हे आदेश न पटल्यामुळे विश्वदिप रोडे महाराष्ट्र न्यायाधीकरण प्राधिकरणात गेले आहेत.
दि. ६ जानेवारी रोजी एका पित्याने आपली मुलगी पळून गेली आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक रोडे पैसे मागत असल्याची तक्रार दिली होती. ती पोलिस उपमहानिरिक्षक कार्यालयात दि. १३ जानेवारी रोजी आवक झाली. त्यावर पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी प्रष्ठांकन केले आहे. पीएसआय रोडे यांना निलंबित करण्यात येत आहे. त्यांची प्राथमिक चौकशी पोलिस उपअधीक्षक इतवारा यांना देण्यात आली आहे आणि त्याखाली त्यांनी स्वाक्षरी केली आहे आणि स्वाक्षरीच्या खाली दि. १० जानेवारी असे लिहिले आहे.
या प्रकरणात एका व्यक्तीची मुलगी जी २८ वर्षाची आहे. ती लग्न झाल्यानंतर आपल्या प्रियकरासोबत पंचवटी नाशिक येथून ५ जानेवारी रोजी पळून गेली. त्याबाबत पंचवटी नाशिक पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल आहे. तरी पण त्या लोकांनी नांदेड येथे येऊन तक्रार दिली. कारण ते नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे आहेत. या सर्व प्रकरणात पोलिस उपनिरिक्षक विश्वदिप रोडे यांची भेट घेतल्यानंतर पळून गेलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी विश्वदिप रोडे यांनी केली होती. तेव्हा रोडेला ८० हजार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.