सोलापूर : महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण योजने अंतर्गत शहरातील हजारो दिव्यांग व्यक्ती विविध गरजांसाठी लाभ घेत आहे. सदर योजने अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन गरज भागविण्यासाठी मासिक एक हजार देण्यात येत आहेत. सद्यस्थितीत दैनंदिन गरज भागविण्यासाठी वाढत्या महागाईमुळे पालिकेच्या वतीने देण्यात येणार उदर निर्वाह भत्ता पुरेसा नसून मिळणाऱ्या तुटपुंज्या भत्त्यामध्ये कौटुंबिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक खर्च करणेकामी ससेहपालट होत आहे.
तरी दिव्यांग कल्याण योजने अंतर्गत उदरनिर्वाह भत्त्यामध्ये महागाई दराच्या अनुषंगाने मागील पाच वर्षात कोणतीही वाढ झालेली नसून भविष्यातील अडचणींना तोंड देण्यासाठी मासिक उदरनिर्वाह भत्ता दोन हजार रुपये करण्यात यावा. सोलापूर शहरातील तमाम दिव्यांग बांधवांना सक्षमीकरण हेतुपुरक निर्वाह भत्ता वाढवून मिळावा ह्या मागणीचे निवेदन आज सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होनकोंबडे, सत्तार बागलकोटे, विजयशेखर चिनवार, बाबू पोतगूळी, सुहास ऐडके, सुरेखा बुरकुले, सुरेखा चवरे, आणि वासंती होनकोंबडे आदीजण उपस्थित होते.