39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीकृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर चरित्रग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर चरित्रग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

परभणी : समाजिक परिवर्तन, शेती विकास, उद्योग, जलसंवर्धन, वृक्षारोपण, एक गाव एक स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी आदी कार्यामुळे सबंध महाराष्ट्रात स्वत:सह परभणीचे नाव पोहचवणारे व्यक्तिमत्व म्हणून कृषीभूषण कांतराव काका देशमुख यांची ओळख आहे.

त्यांच्या या कायार्ची प्रेरणा ग्रंथ स्वरूपातून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन व कार्यगौरव सोहळा रविवार, १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर चरित्रग्रंथ व कार्यगौरव सोहळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल भुसारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या चरित्रग्रंथ प्रकाशन व कार्यगौरव सोहळ्याची माहिती देण्यासाठी शनिवार, दि.२ मार्च रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चरित्रग्रंथ व कार्यगौरव सोहळा समितीचे सदस्य सुभाष ढगे, प्रा. डॉ. जयंत बोबडे, नवनाथ जाधव, डॉ. सुनील जाधव आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. भुसारे म्हणाले की, शहरातील राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे दि.१० मार्च रोजी आयोजित या सोहळ्यात मदन पाटील लिखित व गंगाधर बनबरे संपादित ४७५ पानांचा कांतायण-कांतराव काका देशमुखांची कार्यगाथा या चरित्रग्रंथाचे प्रकाशन व कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या जीवनकार्यावर आधारित समाजोन्नतीचे ध्यासपर्व या चित्रफितीचे प्रदर्शन होणार आहे.

सदरील सोहळयाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि.पुरुषोत्तम खेडेकर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कृषिरत्न विजयअण्णा बोराडे, सत्कारमूर्ती कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर, प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, कवि इंद्रजित भालेराव, माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रसिध्द वक्ते तथा इतिहासकार गंगाधर बनबरे

, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, परभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी श्री. भुसारे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर चरित्रग्रंथ व कार्यगौरव सोहळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल भुसारे व सर्व समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR