23.6 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeधाराशिवपळसवाडी येथे तरूणाची आत्महत्या, तीघांवर गुन्हा दाखल

पळसवाडी येथे तरूणाची आत्महत्या, तीघांवर गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील पळसवाडी येथील एका १८ वर्षीय तरूणाने गावातील तीघांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे दि. १९ जानेवारी रोजी गावातील तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पळसवाडी ता. धाराशिव येथील शिवम सतीष शिरसट (वय १८) यांनी दि.१८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहात्या घरात स्लॅबचे हुकास गळफास घेवून आत्महत्या केली. पळसवाडी गावातील आरोपी बाळासाहेब मारुती कोळगे, रोहित बाळासाहेब कोळगे, नानासाहेब दत्तात्रय कोळगे या तीघांनी मयत शिवम शिरसट मानसिक त्रास दिला. मागील केसमधील तुझे वडील, चुलते, भाऊ, आई व नातेवाईक यांची जामीन रद्द करायला लावतो.

तुझे १८ वर्षे पूर्ण झाले आहे, त्यामुळे तुला अटक करायला लावून तुला जेलला टाकायला लावतो व तुझे करियर बरबाद करु अशी धमकी देत होते. सतत शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या जाचास व त्रासास कंटाळून शिवम शिरसट याने आत्महत्या केली. या प्रकरणी शहाजी वसंत शिरसट यांनी दि. १९ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- ३०६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR