24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिली साडी भेट  

सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिली साडी भेट  

काटेवाडी : काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांचा भाऊबीज कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी औक्षण केले. तर सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या साडीबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमावर आभार मानले.

दिवाळी पाडव्यानिमित्त काल उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथेप्रमाणे गोविंद बागेत हजेरी लावली होती. तर बुधवारी (ता. १५) भाऊबीजनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले होते.

राजकीयदृष्ट्या मतभेद झाले तरी दिवाळी सणाला पवार कुटुंब एकत्र आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच दिवाळी उत्सव साजरा झाला. बारामती येथे काल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पक्षीय फूट व अजित पवार गटाबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. या दिवाळी उत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील थेट माध्यमांसमोर येणे टाळले.

दरम्यान, भाऊबीज निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी अजित पवार यांच्या पाठोपाठ यांचे बंधू श्रीनिवास पवार, उद्योजक रणजित पवार , जयंत पवार यांना सर्व बहिणींनी मिळून औक्षण केले. सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना साडी भेट दिल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले.

राजकीय मतभेद बाजूला ठेवत बुधवारी पवार कुटुंबीयांनी काटेवाडीमध्ये भाऊबीज सणानिमित्त एकत्र येत सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे आणि सर्व बहिणींनी औक्षण केले. अजित पवारांपाठोपाठ श्रीनिवास पवार, उद्योजक रणजित पवार, जयंत पवार यांनाही सर्व बहिणींनी मिळून औक्षण केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR