30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रशुक्रवारी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प

शुक्रवारी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सरकारने फेब्रुवारी महिन्यात केवळ लेखानुदान सादर केले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त म्हणजेच पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात बसलेला फटका आणि ऑक्टोबर महिन्यात येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न होणार अशी चिन्हं आहेत. मध्यप्रदेशमध्ये यशस्वी झालेली ह्ललाडली बेहनाह्व सारखी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीमुळे सरकारला १ एप्रिल २०२४ ते ३१जुलै २०२४ या चार महिन्याच्या खर्चासाठी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडावा लागला होता. अंतरिम अर्थसंकल्पातही सरकारने नवीन घोषणा केल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी सादर होणा-या अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार विधानसभेत तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत दुपारी दोन वाजता अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील.

अंतरिम अर्थसंकल्पात २०२४-२५ या आर्थिक वर्षात महसुली जमेपेक्षा खर्च वाढून तब्बल ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तूट येणार असल्याचा आणि राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपये राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच राज्याच्या वार्षिक योजनेसाठी १ लाख ९२ हजार कोटी रुपयांचा निधी प्रास्तवित करण्यात आला होता. मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या उपयोजनाच्या निधीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR