वडोदरा : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वडोदरा येथून जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संशयित दहशतवादी मोहम्मद सहारुल इस्लाम याला अटक केली आहे. तो आसामचा रहिवासी आहे. अळर ने जारोड बसस्थानकाजवळ एका संशयित वाहनाला थांबवून आरोपीला पकडले.
त्याच्याकडून एक एके-४७ रायफल आणि २० हून अधिक जिवंत काडतुसे सापडली आहेत. गुजरात अळर च्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात मोठी कारवाई सुरू असून आरोपीची चौकशी केली जात आहे. गुजरात एटीएसने ३ जुलै रोजी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित ८ दहशतवाद्यांना गुजरात आणि मध्य प्रदेशातून पकडले होते. सर्वांना वेगवेगळ्या जिल्ह्यांतून पकडण्यात आले. यापैकी दोघांचे वय १८ आणि १९ वर्षे आहे. हे सर्व गुजरातमध्ये खीटचे एक सक्रिय नेटवर्क तयार करण्यासाठी काम करत होते, जेणेकरून दहशतवादी कारवाया घडवून आणता येतील. माहिती मिळाल्यानंतर एटीएसने ५ वेगवेगळ्या पथकांची स्थापना करून मोठी मोहीम राबवली होती.
एटीएसच्या पथकांनी गुजरातमधील बनासकांठा, मेहसाणा, नवसारी, पाटण आणि मध्य प्रदेशातील देवास येथून ८ जणांना अटक केली. तपासात असे आढळून आले की हे सर्व गुजरातचेच रहिवासी असून एका पाकिस्तानी हँडलरच्या इशा-यावर काम करत होते. गुजरात एटीएसने १५ जुलै रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित ५ संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. या सर्वांना पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्यातील खाडियाल गावातून पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख बिलाल आबिदभाई शेरा, मोहम्मद अय्युब कादीवाला, मोहम्मद पालनपुरी उर्फ खाली अय्युब सुनसारा, शफिया रईस मुख्ती आणि मोहम्मद हसन कार्डिया अशी झाली.
















