22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयनिलंबित खासदारांचा सरकारविरोधात मोर्चा

निलंबित खासदारांचा सरकारविरोधात मोर्चा

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेबाबत गंभीर चुक समोर आली होती. या मुद्यावरून विरोधी पक्षांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत संसदेत निवेदन देण्याची मागणी केली. विरोधी खासदारांनी संसदेत गोंधळ घातल्याच्या आरोपावरून लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष कारवाई करत तब्बल १४६ खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले. विरोधी पक्षाच्या खासदारांनीही गुरुवारी सरकारविरोधात मोर्चा काढत निषेध व्यक्त केला.

इंडिया आघाडीने काढलेल्या या मोर्चात खासदारांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व पक्षांचे खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांनी हातात मोठा बॅनर घेतला होता. ज्यावर ‘लोकशाही वाचवा’ आणि ‘संसद बंद, लोकशाही हद्दपार’ असे लिहिले होते. मोर्चा काढणाऱ्या खासदारांचे नेतृत्व काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. ते म्हणाले की, जवळपास दोन तृतीयांश विरोधकांना लोकसभेतून बाहेर काढून भाजपने गुन्हेगारी कायद्यांची जागा घेण्यासाठी तीन विधेयके मंजूर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR