शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘वर्षा’ बंगल्याचा प्रतीकात्मक लिलाव

मुंबई : शेतक-यांची संपूर्ण कर्जमुक्ती, प्रलंबित पीक विमा आणि नियमित कर्जफेड करणा-यांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान या मागण्यांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संघटनेने मुंबईतील विधानभवन परिसरात सरकारविरोधात थेट एल्गार पुकारला होता.

सरकारने शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी आधीच दिला होता. २७ ऑगस्टच्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हा इशारा प्रत्यक्षात आणत थेट वर्षा बंगल्याचा लिलाव मांडला. विधानभवनाबाहेर झालेल्या या अचानक आंदोलनामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानाकडे रवाना केले. मुंबईतील आंदोलनापूर्वीच पोलिस प्रशासनाने तुपकरांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. मात्र नोटिसीला न जुमानता आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. त्यामुळे मंत्रालय परिसर, शासकीय बंगला, आमदार निवास, मरीन ड्राइव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती.

अशा आहेत प्रमुख मागण्या
पूर्ण कर्जमुक्ती : शेतक-यांना बिनशर्त आणि व्यापक शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी.
प्रोत्साहन अनुदान : नियमित कर्जफेड करणा-या प्रामाणिक शेतक-यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तत्काळ वितरित करावे.
पीक विमा व हमीभाव : प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करावी आणि सर्व शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा.

१७ शेतक-यांना मदत
जून आणि जुलै २०२६ दरम्यान राज्यात झालेली अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांसाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट रोजी शासन निर्णय जारी केला आहे. याचा फायदा १७ हजार शेतक-यांना होणार आहे. मदत वाटप करताना एकाच व्यक्तीला दोनदा लाभ मिळून गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आहेत.

अमरावती विभाग
अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील ९,६८३ शेतकरी — १३ कोटी ८० लाख. पुणे विभाग: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील ६,८८५ शेतकरी — ९ कोटी १३ लाख. नागपूर विभाग: वर्धा जिल्ह्यातील ६६१ शेतकरी — ३८ लाख ८७ हजार रुपये मदत मिळणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news