24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रतडीपार गुंडाने दोन तरुणांवर तलवारीने केला हल्ला

तडीपार गुंडाने दोन तरुणांवर तलवारीने केला हल्ला

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमधून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने दोन तरुणांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मीरा रोड येथे बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा घडली. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी गुंडासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुंडाचाच आणखी एक साथीदार काही तासांच्या अवधीत मिरा रोडमध्येच मृतावस्थेत आढळून आला.

सोनू मेंटल म्हणून ओळखला जाणा-या गुंडाचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शहरातून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील पूनम सागर परिसरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात सोनू मेंटलने त्याच्या दोन साथीदारांसह बिपिन सिंग आणि त्याच्या मित्रावर तलवारीने हल्ला केला.

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. सिंग हे एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मेंटलला त्याच्या साथीदारांसह अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR