22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयतामिळनाडूचे मंत्री पोनमुडी यांना तीन वर्षांची शिक्षा

तामिळनाडूचे मंत्री पोनमुडी यांना तीन वर्षांची शिक्षा

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेमुळे पोनमुडी यांचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात येणार असून मंत्रीपदही गमवावे लागणार आहे. तसेच मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी जयचंद्रन यांनी पोनमुडी यांची पत्नी पी. विशालाक्षी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांनी पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला प्रत्येकी ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

हायकोर्टाने पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला आधीच दोषी ठरवले होते, पण गुरुवारी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील एन आर एलांगो यांनी कोर्टाला विनंती केली की त्यांना सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल करण्यासाठी आणि शिक्षा स्थगित करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यास मुदत द्यावी.

न्यायमूर्तींनी त्यांना ३० दिवसांची सवलत दिली आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला ३० दिवस स्थगिती दिली. ही मुदत संपल्यानंतर त्यांना विल्लुपुरम येथील ट्रायल कोर्टात हजर राहावे लागेल, असे न्यायाधीशांनी सांगितले. कायदेतज्ज्ञांच्या मते, शिक्षेनंतर पोनमुडी यांनी विधानसभेचे सदस्यत्व गमावले आणि त्यांचे मंत्रीपदही गमावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR