24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीय‘गगनयान’वर लक्ष्य

‘गगनयान’वर लक्ष्य

चांद्र्रयान ३, आदित्य एल १ यशस्वी नासाला जमले नाही, ते इस्रो करणार

बंगळूरू : चांद्रयान ३ च्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सूर्याच्या दिशेने आदित्य एल १ चे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोने जगाला आपली ताकद दाखवून दिली. इस्रोचे जगभरातून कौतुक होत आहे. इस्रो सर्वांत महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेवर मोठ्या प्रमाणात काम करत असून, आता एक नवे मिशन हाती घेत आहे. इस्रोकडून भरपूर अपेक्षा उंचावल्या असून, नव्या मोहिमेची प्रतीक्षा लागून राहिल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रो संस्थेने आता नव्या मिशनवर काम सुरू केले आहे. चंद्र, सूर्यानंतर इस्रो आता मंगळ ग्रहाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी इस्रोने तयारी सुरु केली आहे. २०२४ मध्ये इस्रो मंगलयान २ मिशन लॉन्च करणार आहे. नासाला ज्यामध्ये यश मिळालेले नाही, ती रहस्य उलगडण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. मात्र, तत्पूर्वी इस्रोचे सर्व लक्ष मिशन गगनयानवर आहे. भारताची ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे. सन २०१४ मध्ये भारताची पहिली मंगळ मोहीम यशस्वी ठरली होती. महत्त्वाचे म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी पाऊल ठेवणारा भारत जगातील पहिला देश ठरला होता. मंगळयान १ ही भारताची दुस-या ग्रहावरील पहिली मोहीम होती. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे मिशन लॉन्च करण्यात आले होते.

मंगळाची नवी माहिती मिळू शकते
मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या मंगळयान १ ने प्रवेश केला होता. आता इस्रो मंगळ ग्रहाच्या पुढच्या टप्प्यावर काम सुरु करणार आहे. मार्स ऑर्बिटर मिशन – २ मध्ये मंगळाच्या ऑर्बिटमधूनच तेथील पर्यावरण आणि वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. या मिशनद्वारे अद्यापपर्यंत रहस्य बनलेली बरीच नवीन माहित मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

पेलोड पाठविणार
मंगळयान-२ मिशनमध्ये चार पेलोड पाठवण्यात येतील. मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट असेल. हा पेलोड मंगळावरील धुळीचा अभ्यास करेल. त्याशिवाय एनर्जेटिक आयन स्पेक्ट्रोमीटर असेल. त्याद्वारे चुंबकीय किंवा गुरुत्वाकर्षणाची माहिती मिळवली जाणार आहे. रेडियो ऑकल्टेशन हा तिसरा पेलोड मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड एक्सपेरिमेंट या चौथ्या पेलोडमध्ये हाय रिजॉल्यूशन कॅमेरा असेल, ज्याद्वारे मंगळाचे फोटो काढण्यात येतील, असे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR