30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रटाटा अमरावतीमध्ये सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर उभारणार

टाटा अमरावतीमध्ये सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर उभारणार

अमरावती : विशेष प्रतिनिधी
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. दरवर्षी १८० व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षित करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

टाटा समूह उभारत असलेली उड्डाण प्रशिक्षण संस्था दक्षिण आशियातील सर्वात मोठी असणार आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही संस्था सुरु होईल अशी शक्यता आहे.

एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, ही सुविधा देशात स्थापन केलेली पहिली सुविधा असेल. यात प्रशिक्षणासाठी ३१ स्ािंगल इंजिनची विमाने आणि तीन ट्विन इंजिनची विमाने असतील. एअर इंडियाने सांगितले की त्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ३० वर्षांसाठी सुविधा उभारण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन म्हणाले, तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. यामध्ये प्रशिक्षित तरुण पायलट एअर इंडियाच्या जागतिक दर्जाची एअरलाइन बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला चालना देतील.

एमएडीसीच्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे म्हणाल्या, एमएडीसी आणि एअर इंडिया यांच्यातील सहयोगी उपक्रमामुळे विमान वाहतूक क्षेत्रात केवळ ३,००० हून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार असेच नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR