आता शिक्षकांच्या कामावर व्हॉट्सअ‍ॅपवरून नजर! ;प्रत्येक जिल्ह्यात ‘विषय समित्या’

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा स्तरावर विषयनिहाय शिक्षकांच्या ‘विषय समित्या’ स्थापन करण्याचा आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला आहे.
शिक्षण आयुक्तांनी ८ जुलै २०२६ रोजी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप अशा समित्या स्थापन झालेल्या नाहीत, तेथे त्या तात्काळ स्थापन करण्याचे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

‘परख’ सर्व्हेक्षणानुसार इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विषय समित्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. स्थापन करण्यात आलेल्या सर्व विषय समित्यांचा अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून होणार थेट मॉनिटरिंग
कामात तत्परता आणि सुसूत्रता यावी यासाठी प्रत्येक विषय समितीचा एक स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला जाणार आहे. या ग्रुपमध्ये संबंधित अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि विषय समितीचे सदस्य सहभागी असतील. जिल्हास्तरासोबतच राज्यस्तरीय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार केला जाणार असून, यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयातील उत्कृष्ट, निवडक आणि नवोपक्रमशील पाच शिक्षकांचा समावेश केला जाईल.

अशा प्रकारे काम करतील विषय समित्या
या समित्यांमध्ये कृतिशील, नवोपक्रमशील आणि समर्पित शिक्षकांचा समावेश करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या विषय समित्यांमार्फत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, अध्ययनस्तर चाचण्यांचे नियोजन करणे, अध्यापन साहित्य व शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे.

या सर्व विषयांच्या स्थापन होणार समित्या
माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांच्या समित्या स्थापन केल्या जातील. तर उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इतिहास, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, अर्थशास्त्र तसेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयांच्या समित्या स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आणि शिक्षकांना तंत्रज्ञानाची जोड देऊन थेट जोडण्यासाठी शिक्षण संचालकांचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news