कोलकाता : भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसह इंग्लंड दौ-याची सुरुवात करणार आहे. त्यानंतर भारत इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येईल. टी २० मालिकेची सुरुवात २८ जून पासून होणार असून वनडे मालिकेतील पहिला सामना हा १६ जुलैला नियोजित आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हे हरमनप्रीत कौरकडे असून स्मृती मानधना उपकर्णधार आहे. इंग्लंड दौ-यावर संघात जो सर्वात मोठा बदल झालाय तो म्हणजे लेडी सेहवाग अर्धात शफाली वर्माची भारतीय महिला संघात एन्ट्री झाली आहे. तिच्याशिवाय सयाली सतघरे हिलाही टी-२० मध्ये संधी देण्यात आली आहे. वनडेत श्री चरणी, शुची उपाध्याय, क्रांतीसह, अमनजोत कौर आणि स्रेह राणा यांना संधी मिळाली आहे.
आगामी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघासाठी इंग्लंडचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. इंग्लंड दौ-यासाठी निवडलेल्या संघातूनच घरच्या मैदानात रंगणा-या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौ-यात हरमन ब्रिगेड कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.
टी २० साठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिंग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्रेह राणा, श्री चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड़, सयाली सतघरे.