बहुचर्चित ‘प्रहार’चा टीझर प्रदर्शित

मुंबई : आगामी बहुचर्चित चित्रपट ‘प्रहार’चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट २००८ मधील मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये राजकुमार रावने वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी मोठा कायदेशीर लढा दिला होता.

१ मिनिट ५३ सेकंदांच्या या टीझरमध्ये राजकुमार राव वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसत आहे. २६/११ च्या हल्ल्याचा आरोपी अजमल कसाबला फाशी मिळवून देण्यासाठी तो न्यायालयात प्रयत्न करताना दिसतो. यादरम्यान तो कोर्टात आपले युक्तिवाद मांडतो. जेव्हा अजमल कसाबचे हल्ला करतानाचे फोटो आणि व्हीडीओ सर्वांसमोर आहेत, तर मग त्याला फाशी देण्यास उशीर का होत आहे? असा सवाल तो न्यायालयाला विचारताना दिसतो. याशिवाय ”याला मारु नका हा इव्हिडन्स आहे”, असा मराठीत संवाद तो करताना दिसतो.

टीझरमध्ये राजकुमार राव एका दमदार भूमिकेत दिसतोय. त्याच्या व्यतिरिक्त टीझरमध्ये अभिनेत्री वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांचीही झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकरचे अजमल कसाबच्या रुपातील जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोक थक्क झालेत. हा चित्रपट ७ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03
Video thumbnail
चार राज्यांना जोडणाऱ्या नरसी फाट्यावर मोठी कारवाई; ६० हून अधिक पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमण हटवले!
03:17
Video thumbnail
मराठीची भुरळ! अभिनेत्री विद्या बालनचा 'हा' भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
00:45
Video thumbnail
Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2026 | विधानसभा कामकाज लाइव्ह प्रेक्षपण
02:09:17
Video thumbnail
Latur|एकमतचा दणका! झोपेतले पोलीस जागे, कोयता गँगची काढली धिंड
03:54
Video thumbnail
BREAKING : संच मान्यता निकषांवरून लातूरमध्ये शिक्षक संघटना आक्रमक;शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे
04:37
Video thumbnail
2019 च्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; सरकारला कैलास पाटलांचा सवाल #marathilivenews #breakingnews
02:21
Video thumbnail
Parbhani |ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण!;तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच..
00:54

Latest news