28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयटॅक्सी दरीत कोसळल्याने भीषण अपघात; ७ ठार, ४ जखमी

टॅक्सी दरीत कोसळल्याने भीषण अपघात; ७ ठार, ४ जखमी

नैनिताल : आज सकाळी (शुक्रवारी) नैनिताल जिल्ह्यातील ओखलकांडा ब्लॉकच्या छीरखान-रीठासाहेब रोडवर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील ५०० मीटर खोल दरीत टॅक्सी कोसळल्याने ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमध्ये हा भीषण अपघात झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी खोल खड्ड्यात पडल्याने ७ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅक्सीत ११ जण प्रवास करत असण्याची शक्यता आहे. अपघातात वाहनातील दोन महिला, एक बालक आणि चार पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. वाहन पडल्याचा आवाज येताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांनी तातडीने मदत आणि बचाव केले. त्यांनी पोलिसांनाही संपर्क साधला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य हाती घेतले.

या भीषण अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत, तर पोलिस घटनेचा आधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR