27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

कोल्हापुरात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा (बस) भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी येथे पोहोचली. प्रवासादरम्यान ही बस उलटली. ही बस एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याचे सांगितले जात आहे.

ही स्लीपर कोच बस कोल्हापूर शहरालगत पुईखडी भागात राधानगरी रोडवर वळण घेताना उलटली. या अपघातात पुण्यातील तीन जण ठार झाले आहेत. या बसमध्ये जवळपास २५ प्रवासी होते. बस उलटल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तर चार प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांनादेखील बाहेर काढले. या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १६ प्रवासी सुखरूप आहेत.

या अपघातात निलू गौतम (४३), रिद्धिमा गौतम (१७) आणि सार्थक गौतम (१३) या तिघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान आणि मुख्य अग्निशमन अधिका-यांनी बचावकार्य पार पाडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR