29.2 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रकुडाळमध्ये ठाकरे आणि शिंदेंचे सैनिक भिडले

कुडाळमध्ये ठाकरे आणि शिंदेंचे सैनिक भिडले

कुडाळ : कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाची उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाखाली महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली आहे. दोन्ही गटातील पदाधिका-यांनी समजूत काढत हे प्रकरण शांत केले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे आपले दालन सोडून खाली आल्या त्यांनी पोलिसांना दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याच्या सूचना दिल्या. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या अर्ज सुनावणी वेळी एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जाला आक्षेप घेत त्या उमेदवाराच्या एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निवडणूक निर्णय अधिका-यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एक तासाचा वेळा दिला. त्याप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी संबंधित सूचक प्रांताधिकारी कार्यालयात जात असता युतीच्या एका कार्यकर्त्यांने त्याला आत जाण्यास विरोध करीत अडवीत धक्काबुक्की केली. यावेळी बाहेर थांबलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आत येत युतीच्या त्या कार्यकर्त्याला जाब विचारला.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे निलेश आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने-सामने असणार आहेत. कुडाळ मालवणमधून निवडणूक लढण्यासाठी निलेश राणे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात कुडाळ-मालवणची जागा शिवसेनेला जाणार असल्याने राणेंनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा राणे आणि वैभव नाईक हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने असणार आहेत.

निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून यापूर्वी वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. शिवाय, त्यानंतर नारायण राणे मुंबईतील वांद्रे विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत मैदानात उतरले होते. त्यावेळीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR