22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरेंचे ‘टोमणे बॉम्ब’ हे अस्त्र आता बोथट झालेय

ठाकरेंचे ‘टोमणे बॉम्ब’ हे अस्त्र आता बोथट झालेय

मुंबई : उद्धव ठाकरेंचे ‘टोमणे बॉम्ब’ हे अस्त्र आता बोथट झाले आहे, अशी घणाघाती टीका दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना देखील त्यांनी काहीही केलेले नाही, फक्त टीका करणे हेच आदित्य ठाकरेंचे काम आहे. मुख्यमंत्र्यांसाठी कुठलेही विकासाचे काम हे चुटकीभर असते. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काही केलेले नाही. देवेंद्र फडणवीस पुरणपोळ्या खात नाहीत, तर लोकांच्या ताटात पुरणपोळ्या कशा जातील यासाठी प्रयत्न करतात असे केसरकर म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत खैरे सत्तेत असताना औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करू शकले नाहीत. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठराव मांडला आणि आमच्या सरकारने तो ठराव मान्य करून मंजुरी देखील आणली. त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा आमच्या सरकारचे अभिनंदन केले पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

जाधवांचे आमच्या पक्षात स्वागतच
आमच्याकडे आल्यास शंभर टक्के त्यांचे स्वागत केले जाईल. कारण ते एक लढवय्या नेते व उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद वाढेल. मात्र, त्यांची नाराजी कशाबद्दल आहे हे मात्र मला माहीत नाही. परंतु, ते पक्षात आल्यास निश्चितच स्वागत होईल, असे केसरकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR