24 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’बाहेर घातपाताच्या ‘त्या’ फोनला आता ‘प्रेमकहानी’चं वळण

‘मातोश्री’बाहेर घातपाताच्या ‘त्या’ फोनला आता ‘प्रेमकहानी’चं वळण

मुंबई : ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर घातपात होण्याची शक्यता असल्याची बातमी १५ जानेवारी रोजी सकाळी सकाळी थडकली. त्यानंतर पोलीसही अलर्ट झाले. आता या प्रकरणातील लव्हस्टोरीचा अँगल समोर आला आहे.

मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याचा निनावी कॉल लव्ह ट्रॅँगलमधून आल्याचं समोर आलं आहे. जो नंबर अज्ञात आरोपीने पोलिसांना दिला होता. त्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली.

गुजरात ते मुंबई ट्रेनमधून चार ते पाच तरुणांचा ग्रुप मुंबईला येत असून ते मातोश्रीवर घातपात घडवणार आहेत, असा कॉल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. या कॉल करणा-या व्यक्तीने एक फोन नंबर पोलिसांना दिला होता. पोलिसांनी त्या नंबर धारकाची चौकशी केली. चौकशीत अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ज्या व्यक्तीचा नंबर दिला होता. त्याच्या प्रेयसीने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात हा कॉल केल्याचं समोर आलं आहे. आता पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

त्या व्यक्तीने पोलिसांना काय सांगितलं?
एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करत धक्कादायक माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणा-या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणा-या प्रवाशांमधील संभाषण ऐकलं. या ४ ते ५ मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकलं, असं या व्यक्तीने सांगितलं. हे मुस्लिम तरुण उर्दू भाषेत संभाषण करत होते. हे तरुण मोहम्मद अली रोडवर रुम भाड्याने घेणार आहेत. लवकरच हे लोक ठाकरेंच्या घराबाहेर घातपात करणार असल्याचं या व्यक्तीने सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR