34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजहाजाच्या धडकेने पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली

जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली

वॉश्ािंग्टन : अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज हा पूल जहाज धडकल्याने कोसळले. मेरीलँड ट्रान्सपोर्ट ऑथॅरिटिने यासंदर्भातील माहिती दिली. यासंदर्भातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मोठी दुर्घटना असून अनेक वाहने पाण्यात पडल्याची माहिती आहे.

अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार १:३५ वाजता ही दुर्घटना घडली. काही सेकंदामध्येच ब्रिज कोसळला आहे. अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली. तसेच लोकांना वेगळ्या मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. माहितीनुसार, अनेक वाहने पाण्यात पडली आहेत. सिंगापूरचा झेंडा असलेले ३०० मीटर लांबीचे जहाज ब्रिजला धडकले होते.

अपघातामधील जीवितहानीची माहिती मिळू शकलेली नाही. बाल्टिमोरच्या महापौरांनी सांगितले की, त्यांना अपघाताची माहिती मिळाली आहे. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR