40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयकंगना राणावतवर वादग्रस्त पोस्ट

कंगना राणावतवर वादग्रस्त पोस्ट

- ‘पोस्ट मी केलीच नाही’ : सुप्रिया श्रीनाते - भाजपा आक्रमक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपाने अभिनेत्री कंगना राणावतला मंडीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र अभिनेत्री कंगना राणावतला भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर टीका केली. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी त्यांच्या सोशल माध्यमांद्वारे एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली.यामध्ये कंगनाचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आला. त्या फोटोच्या खाली अश्लील शब्दांत कॅप्शन देण्यात आले. हा फोटो नंतर डिलिट करण्यात आला. मात्र या पोस्टवरून वाद रंगला आहे. अशात नेटक-यांनीही कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. ऊर्मिला मातोंडकरबाबत कंगना काय म्हणाली होती त्याची आठवण नेटक-यांनी तिला करून दिली आहे.

दरम्यान ,हमाचल प्रदेशातील मंडी या ठिकाणाहून कंगनाला उमेदवारी जाहीर झाली आहे. हाच संदर्भ घेत काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनाते यांच्या फेसबुक अकाऊंटवरून कंगनाचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आला. त्या फोटोच्या खाली वादग्रस्त ओळी लिहिण्यात आल्या. त्यामुळे देशभर वादंग निर्माण झाले.

यावर कंगनाने जोरदार पलटवार केला. त्यानंतर सुप्रिया श्रीनाते यांनी ती पोस्ट आपण केली नसल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाने सुप्रिया श्रीनाते यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
मात्र यानंतर सुप्रिया श्रीनाते यांनी ‘ती पोस्ट आपण केली नाही. माझं सोशल माध्यम हँडल वापरणा-याने ती पोस्ट केली असेल. मी एका स्त्रीसाठी कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. मला ओळखणारा कोणीही याबाबत सांगू शकेल. माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे.’

कंगनाने केला जोरदार पलटवार
सुप्रिया श्रीनाते यांनी कंगनावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्याला कंगनाने जोरदार पलटवार केला आहे. मी विविध चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. प्रत्येक महिला सन्मानास पात्र आहे. यानंतर सुप्रिया श्रीनाते यांनी कंगनावर केलेली पोस्ट डिलीट केली आहे.

नेटकरी काय म्हणाले आहेत?
या सगळ्या प्रकरणानंतर नेटक-यांनी ऊर्मिला मातोंडकरला कंगना सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणाली होती त्याची आठवण करून दिली आहे. कंगनाच्या मुलाखतीचा तो अंश लोक एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आहेत आणि तू ऊर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस त्याचं काय? असे विचारत आहेत. जे आता कंगनाबाबत पोस्ट केली म्हणून गळा काढत आहेत त्यांनी कंगनाचा ऊर्मिलाबाबतच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे.

ऊर्मिला मातोंडकरबाबत काय म्हणाली होती?
‘‘ऊर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती ओळखली जाते ती फक्त तिच्या सॉफ्ट पॉर्नसाठी. तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही? ’’ असा प्रश्न कंगनाने विचारला होता. तिचा हाच व्हीडीओ व्हायरल झाला आहे. कंगनाने २०२० मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा उल्लेख केला आहे.

महिला आयोगाने फटकारले
राष्ट्रीय महिला आयोग सुप्रिया श्रीनाते यांनी केलेल्या पोस्टचा निषेध नोंदवतो. एखाद्या महिलेबाबत अशाप्रकारे पोस्ट करणं आणि त्यावर चुकीच्या गोष्टी पसरवणं ही बाब महिलेचा अपमान करणारी आहे. निवडणूक आयोगाने सुप्रिया श्रीनाते यांच्यावर तातडीची कारवाई केली पाहिजे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR