25.6 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्रनागरिकांना खण, पैठणी कापडातील आकाशकंदिलांची भुरळ

नागरिकांना खण, पैठणी कापडातील आकाशकंदिलांची भुरळ

पुणे : प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठेत यंदा पर्यावरणपूरक असे खण आणि पैठणी कापडातील आकाशकंदिलांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावरच्या आकाशकंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवत आहे.

दरम्यान, दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीची शोभा वाढवणारे वेगवेगळ्या आकारातील आणि आकर्षक रंगातील आकाशकंदील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत. ५०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. दरवर्षी काहीतरी हटके शोधात नागरिक असतात. त्यामुळे आता नागरिकांना खण आणि पैठणीच्या कापडापासून तयार केलेले पारंपरिक आकाशकंदील भुरळ घालत आहे.

तसेच यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामाच्या प्रतिमेचे आकाशकंदिलदेखील उपलब्ध आहेत. विविध रंगातील पैठणीच्या व खणाच्या कापडापासून बनविलेले पारंपरिक चौकोनी, षटकोनी आकाराचे आकाशकंदिल हे यंदा नवीनच असल्याने ग्राहकांचा खरेदीसाठी कल दिसून येत आहे. तसेच यातील छोट्या आकारातील डेकोरेशनसाठी लावण्यात येणारा आकाशकंदीलही उपलब्ध आहेत.

दरवर्षी असणारे बाजारातील आकाशकंदील
यामध्ये हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोजन कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, मेटल स्टार, लोटस, फायरबॉल, झगमगते आकाशकंदील, विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाशकंदील पाहायला मिळत आहेत. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, बॉल, पॅराशूट असे प्रकार आहेत. बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर टाळून केलेल्या पारंपरिक व पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदी करण्याकडे ग्राहक आकर्षित होत आहेत.

बांबूच्या काड्यांचे आकाशकंदील
कागद आणि कापडाबरोबरच मायक्रॉन आणि बांबूच्या काड्यांपासून बनविलेले आकाशकंदील हे वेगळेपणा जपत आहेत. मायक्रॉनच्या रंगीबेरंगी धाग्यापासून सुरेख विणकाम केलेले आकाशकंदील लक्षवेधी ठरत आहेत. तर बांबूच्या काड्यांपासून तयार केलेले आकाशकंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR