लातूर (प्रतिनिधी ) : लोकनियुक्त लोकप्रतिनिधी गेल्या सात वर्षांपासून लातूर शहर महानगरपालिकेत नाहीत़ प्रशासकीय कारभार असल्यामुळे नागरी समस्यांचा गुंता वाढत गेला़ नागरी समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाइी ‘एकमत’ने ग्राऊंड रिपोर्ट हा विशेष कार्यक्रम सुरु केला आहे़ शनिवारी शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांशी भेट घेऊन त्यांना बोलते केले असता त्यांनी गाºहाण्यांचा पाढा वाचला़ लता राऊत नामक ज्येष्ठ महिलेने जिंदगी गेली धुराळ्यात, पण घरासमोरील रस्ता होत नाही, अशी व्यथा मांडली.
प्रभाग क्रमांक २ मध्ये बरकतनगर, म्हैसूर कॉलनी, हरिभाऊनगर, वकील कॉलनी, तुळजापूरेनगर, गवळीनगर, कुंभार गल्ली आणि एस़ ओ़ एस़ हा भाग येतो़ या प्रभागात बहूतांश नागरीक हे काबाड कष्ट करणारे आहेत़ त्यामुळे सकाळी सकाळी कामावर गेलेली मंडळी सायंकाळीच घरी परतणाऱ परिणामी प्रभागात लातूर शहर महानगरपालिकेचा कोणता अधिकारी, कर्मचारी आला आणि त्यांनी कधी नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या, असे कधी झालेच नाही़ बरकतनगरमध्ये अद्यापही मुलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत़ म्हैसूर कॉलनीचीही तीच आवस्था आहे़ हरिभाऊनगरमध्ये तर पक्के रस्तेही नाहीत़.
या नगरातील ज्येष्ठ महिला लता राऊत यांनी भाराभर समस्या मांडल्या़ घरासमोरील रस्ता कच्चा असल्याने दिवसभर घरात धुराळा पसरतो़ हा रस्ता तत्काळ होणे आवश्यक आहे़ दुसºया ज्येष्ठ महिला शहेजादबी मुल्ला म्हणाल्या की, नळाला पाणी येते़ परंतु, पुरत नाही़ टाक्या उभ्या केलेल्या आहेत़ बोअरच्या पाण्याची पाईप लाईन मात्र, सर्वांच्या सोयीची होईल, अशी केलेली नाही़ परिणामी काही लोकांच्या घरात २४ तास पाणी तर बहूतांश नागरिकांना घागरभरही पाणी मिळणे मुशकील आहे़ सिद्धार्थ गायकवाड यांची कचºयाचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले़ खुल्या प्लॉटमध्ये नागरिक कचरा टाकतात़ तो कचरा घंटागाडीवाले उचलत नाहीत़ याबाबत वारंवार सांगुनही उपयोग होत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
नगरसेवक नाहीत़ मनपा प्रशासन कोणतीही गोष्ट कानामागे घालते़ नागरी प्रश्न कोणासमोर मांडावेत, ही मुख्य अडचण असल्याचे अनेक नागरिकांनी सांगीतले़ हरिभाऊनगरच्या उत्तर बाजूस एक नाला आहे़ या नगरातील सर्वच गटारींचे पाणी या नाल्यात जाते़ हा नाला पुढे खुल्या प्लॉटमधून ताजोद्दिनबाबानगरकडे जातो़ वाहून आलेली घाण, कचरा यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे़ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ याकडे कोणीच लक्ष देत नाही़ सात वर्षांनंतर लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक होऊ घातली आहे़ ही निवडणुक लवकरात लवकर व्हावी, नागरिकांचे प्रश्न जाणणारे, प्रभागाशी संपर्कात असणारे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे काम करणारे नगरसेवक असावेत, अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांनी केली आहे.