19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयदेशाची सौरमोहीम अखेरच्या टप्प्यात

देशाची सौरमोहीम अखेरच्या टप्प्यात

इस्रो प्रमुखांनी दिली माहिती

बंगळूरू : भारताची पहिली सौर मोहीम आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. आदित्य यान हे लवकरच एल-१ पॉईंटवर पोहोचणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. आदित्य यान अगदी सुस्थितीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘आदित्य एल-१’ ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणा-या एल-१ या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. या ठिकाणाहून आदित्य यान २४७७ सूर्याचा अभ्यास करू शकणार आहे. २ सप्टेंबर रोजी आदित्य यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. यानंतर काही दिवसांनी आदित्यने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून एल-१ पॉईंटकडे प्रवास सुरू केला होता. २९ ऑक्टोबर रोजी आदित्य यानावर असणा-या हाय एनर्जी एल-१ ऑर्बिंिटग एक्स-रे स्पेक्टोमीटरने सोलार फ्लेअर डिटेक्ट करुन त्यांचे रेकॉर्डिंग केले होते.

आदित्य यान हे एल-१ लॅग्रेंज पॉइंटवर कधी पोहोचणार याबाबत देखील सोमनाथ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की सर्व क्रियाकल्प पार पाडून आदित्य यान हे ७ जानेवारी २०२४ रोजी एल-१ पॉइंटवर पोहोचू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR